Rajasthan Election Result 2023 : जयपूरमध्ये लाडू, केक अन् सेलिब्रेशन ; कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट

Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. काही वेळातच राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील 199 विधानसभा जागांचा निकाल समोर येणार आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात भाजपमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमधील चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कलानुसार, राजस्थानमध्ये भाजप ११५ जागांवर आघाडीवर आहे.
#WATCH | #RajasthanElections2023 | BJP workers dance and celebrate at the party office in Jaipur as the party continues its lead in the state.
As per official EC trends, BJP – 115 and Congress – 67 here. pic.twitter.com/sRyvMRIk6k
— ANI (@ANI) December 3, 2023
या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यास सुरू केला आहे. जयपूरमध्ये महिला उत्साहात सेलिब्रेशन करताना दिसून येत आहे. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी लाडू, केक आणि मिठाई भरवून जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.





