राजमौली बनवणार देशातील सर्वात महागडा सिनेमा; महेश बाबू दिसणार मुख्यभूमिकेत

Entertainment : सध्या दाक्षिणात्य सिनेमांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी बाहुबली,आरआरआर यासारखे बिग बजेट सिनेमा तयार केले. आरआरआर सिनेमा ऑस्करपर्यंत पोहोचवला. या सिनेमांमुळे त्यांची जगभरात चर्चा झाली. यानंतर आता राजमौली भारतातील सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा ते बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिकेत साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता महेश बाबू दिसणार आहे.
दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाचे नाव ‘एसएसएमबी 29’ असे आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी खूप मोठे बजेट ठेवले आहे. तब्बल 1000- 1500 कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार होणार आहे असं म्हटलं जात. निर्मात्यांकडून त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा भारतीय इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. याआधी ‘बाहुबली’ मालिका आणि ‘आरआरआर’ही मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आल्या होत्या.
‘बाहुबली’ मालिका दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी सुमारे 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवली होती. तर, ‘RRR’ निर्मात्यांनी 550 कोटी रुपयांमध्ये बनवला होता. एसएस राजामौली आणि महेश बाबू यांचा 1500 कोटींच्या बिग बजेट सिनेमा 2025मध्ये रिलीज होणार आहे.
हा चित्रपट आफ्रिकेच्या घनदाट जंगलात शूट होणार आहे. या चित्रपटात निर्माते जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. महेश बाबू यांच्यासह या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, दीपिका पादुकोण आणि राणा दग्गुबाती, सोनू सूद आणि संजय दत्त सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.





