मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी 15 एप्रिलला सोलापुरात सभा घेणार आहेत. तसेच कोल्हापुरात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराकरता सभा घेणार असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे यांनी अनके सभांमधून भाजपविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी भाजप विरोधात त्यांनी कंबर कसली आहे.
राज ठाकरे सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात येणार आहेत. पक्षाकडून या सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. गुढी पाडवा मेळाव्यामध्ये अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 19 मार्चच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्येही राज यांनी लोकसभा लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.