राज ठाकरेंच्या घरी गणरायाचे आगमन; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच येणार ‘शिवतीर्था’वर
Raj Thackeray | राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल-ताशाच्या गजरात घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्था’वरही गणरायाचे आगमन झाले आहे. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन रवाना
अखेर आता ठाकरे बंधु पुन्हा एकदा सोबत पाहायला मिळणार आहेत. राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झाले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सह कुटुंब उद्धव ठाकरे हे येथे येणार असल्याचे म्हंटले जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थवर येणार आहे. यापूर्वी राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी आले होते. Raj Thackeray |
त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी गणेशाच्या दर्शनासाठी घरी येण्याचे आमंत्रण फोन करून दिले होते. हे आमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले होते आणि आणि आज ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधुच्या भेटीगाठीनंतर आता गणपतीच्या आगमनानिमित्त पुन्हा त्यांची भेट होणार आहे. Raj Thackeray |
हेही वाचा:




