ठरलं .. राज ठाकरेंची पुण्यात 18 एप्रिलला सभा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात येत्या 18 एप्रिलला जाहीर सभा घेणार आहेत. सिंहगड रस्ता परिसरात मुठा कालव्या जवळील मैदानात ही सभा होणार आहे.

मनसेकडून अद्याप काँग्रेस अथवा इतर कोणत्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिला नसला तरी भाजप विरोधात ही सभा होणार आहे. तसेच ही जागा बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघाच्या सीमारेषेवर असल्याने ही सभा या दोन्ही मतदार संघातील भाजप विरोधी उमेदवारांना फायद्याची ठरणार आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते मात्र लोकसभेसंदर्भात आपण गुढीपाढव्याच्या सभेत भूमिका जाहीर करू असे स्पष्ट केले होते. शनिवारी झालेल्या पाडव्याच्या सभेत मोदी विरोधी भूमिका ठाकरे यांनी जाहीर केली. ही भूमिका जाहीर करताना राज्यात सभा घेणार असल्याचेही जाहीर केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.