Raj Thackeray: ‘शिवतीर्था’वर बाप्पा विराजमान! राज ठाकरेंसह ठाकरे कुटुंबीयांनी केले गणरायाचे स्वागत
Raj Thackeray: गणेश चतुर्थीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले.

Raj Thackeray: गणेश चतुर्थीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले. गणरायाच्या स्वागतासाठी ठाकरे कुटुंबीय एकत्र आले होते. यावेळी राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, आमदार अमित ठाकरे यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. (Raj Thackeray)
गणपती बाप्पाच्या आगमनामुळे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक पद्धतीने गणरायाचे स्वागत करत ठाकरे कुटुंबीयांनी बाप्पाची पूजा-अर्चा केली.
गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे कुटुंबीयांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बाप्पाच्या आगमनाने परिसरातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





