मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत वंचित बहुजन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. या सगळ्या निकालावर आता राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे यांनी एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. अविश्वसनीय! तुर्तास एवढंच असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेमध्ये ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्यात आली. सुरुवातील सर्व जागांवर मनसे उमेदवार उभे करणार आहे, तुम्ही तयारीला लागा असे मनसे अध्यक्षांनी सांगितले होते. यानंतर 138 जागांवर मनसेने उमेदवार दिले होते.