मार्करच्या मुद्यावरून राज ठाकरे संतापले; फडणवीसांनी लगावला खोचक टोला, “उद्याच्या निकालाचा अंदाज लावून…”

Devendra Fadnavis On Raj Thackeray | राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होत असून यादरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत सरकार आणि निवडणूक प्रशासन हे एक प्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटत असल्याचे म्हंटले आहे.
“सरकारने निवडणुका जिंकायचे ठरविले आहे. जे विधानसभेला केले ते आता करत आहे पण आम्ही होऊ देणार नाही. आजपर्यंत शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण करण्यात येत आहे. सॅनिटाईजरने ही खूण पुसली जातेय. फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणे, याला निवडणुका म्हणत नाही, मतदानासाठी शाईऐवजी पेन वापरले जात आहेत, ज्याची शाई सहज पुसली जातेय. लोक बाहेर येतात, शाई पुसतात आणि पुन्हा आत जाऊन मतदान करतात. यालाच सरकार विकास म्हणते का? सध्याची सिस्टीम ही केवळ विरोधकांना संपवण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना जिंकवण्यासाठी काम करत आहे,” असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. Devendra Fadnavis On Raj Thackeray |
#WATCH | Nagpur | On MNS chief Raj Thackeray’s statement, Maharashtra CM Devendra Fadnavis says, “I have also been marked with a marker, is it erasing? The Election Commission should look into this issue and use something else, they can use oil paint if they want, the elections… https://t.co/YQeMZvhZV7 pic.twitter.com/mKN0wDfmDk
— ANI (@ANI) January 15, 2026
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
या प्रकरणावर आणि राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या सर्व गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतात याआधीही अनेक वेळा मार्कर पेन वापरण्यात आला आहे. जर कोणी याबाबत आक्षेप घेत असेल तर इलेक्शन कमिशनने या संदर्भात लक्ष दिले पाहिजे. मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थानवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही, पण मला असं वाटतं की काही लोक उद्याच्या निकालाचा अंदाज लावून आजपासूनच काही गोष्टींवर मुद्दाम भाष्य करत आहेत. उद्याचा निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत हे यातून स्पष्ट दिसून येत आहेत,” असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. Devendra Fadnavis On Raj Thackeray |
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये महानगरपालिकेसाठी मतदान केले. यावेळी त्यांची पत्नी अमृता फडणवीस देखील सोबत होत्या. मतदानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मतदानात मार्करने शाई लावण्याच्या वादावर भाष्य केले. Devendra Fadnavis On Raj Thackeray |
हेही वाचा:
‘कोणतीही रोख सापडली नाही’ ; संसदीय समितीसमोर न्यायमूर्ती वर्मा यांचा पैसे सापडल्याचा इन्कार





