राज ठाकरे स्टँडअप कॉमेडीयन तर अजितदादा कब्बडीचे अध्यक्ष – विनोद तावडे

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या स्टॅंड अप कॉमेडीचे शो करत आहेत, असा निशाणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी साधला आहे. तसेच काल नांदेडला शो झाला असून लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत, अशीही टीका तावडे यांनी केली आहे.

विनोद तावडे म्हणाले कि, राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाही. पण आपल्या सभांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आवाहन करतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. तसेच राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्यावर टीका करताना विनोद तावडे म्हणाले कि, अजित पवार हे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. कबड्डी खेळामध्ये खेळाडूला एखादा गडी बाद करता आला नाही तर तो फक्त मैदानात एंट्री करतो आणि प्रतिस्पर्धी संघाला नुसती हुल मारुन येतो, तसा अजित पवार यांचा फक्त हुल मारण्याचा प्रकार आहे, अशीही टीका त्यांनी केली.

दरम्यान, अजित पवार यांनी भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांची कागदपत्रे माझ्याकडे असून निवडणुका संपल्यानंतर ती कागदपत्रे दाखवेन असे विधान केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.