Raj Thackeray | एकीकडे राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर आता जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. याचदरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. आज दुपारी ते दिल्लीकडे रवाना होत आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण राजकीय नसून कौटुंबिक आहे. राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे यांचे भाऊ डॉ. राहुल बोरुडे यांचे लग्न ५ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याला राज ठाकरे यांच्यासह ठाकरे परिवारातील जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. Raj Thackeray | संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट नुकतेच एका विवाहसोहळ्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांसोबत भाजप नेते आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते. जवळपास २० मिनिटे या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर आता राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत. दिल्लीतील या विवाह सोहळ्याला अनेक राष्ट्रीय पातळीवरील राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात राजकीय भेटीगाठींमध्ये काय चर्चा होणार? याकडे देखील अनेकांचे लक्ष राहणार आहे. Raj Thackeray | हेही वाचा: भूकंपाचा ‘या’ देशाला मोठा हादरा, घाबरून लोकं घराबाहेर पळाली ; ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद