मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेणार असल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांनी अनके सभांमधून भाजपविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी भाजप विरोधात त्यांनी कंबर कसली आहे.
राज ठाकरे सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात येणार आहेत. पक्षाकडून या सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. गुढी पाडवा मेळाव्यामध्ये अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 19 मार्चच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्येही राज यांनी लोकसभा लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
राज ठाकरे यांच्यामागे मोठा युवकवर्ग त्यामुळे ते जर मैदानात उतरले तर भाजपची गोची नक्की होऊ शकते. मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नाही.