पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजप विरोधात राज्यभर ८ सभा घेणार आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, राज ठाकरे मावळ मध्ये सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. खुद्द अजित पवारांनी राज ठाकरेंचे समर्थन केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, राज ठाकरे जेव्हा भाजपकडून भाषण करत होते. तेव्हा भाजप नेत्यांना आतून उकळ्या फुटत होत्या. पण आता त्यांच्या विरोधात भाषण केल्यामुळे विनोद तावडे पोपटासारखे बोलू लागले. राज ठाकरे जे काही सांगतात ते स्क्रीनवर दाखवून सांगतात. राज हे बाळासाबांचे पुतणे असून त्यांना स्क्रिप्ट लिहून देण्याची गरज नाही, असा टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.