पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश आलं. महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. तर मनसेला खातेही उघडता आलं नाही. त्यानंतर अनेकांनी विधानसभा निकालावर संशय व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनाही निकाल मान्य केला नव्हता. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीनी यामध्ये उडी घेतली.
या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही. सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव होतो. अख्खा महाराष्ट्र्ला या निकालावर शॉक बसला आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केले होते. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही. तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली. तेव्हा आम्ही रडत नाही बसलो, अशी टीका अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना पैसे दिले आहेत, ते परत घेणार नाही. पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी सर्व्हे सुरु आहे, असंही अजित पवार म्हणाले.
पुढे म्हणाले, डीपीडीसीसाठी सर्व जिल्ह्यांना मागील वेळेपेक्षा जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी आपली बाजू मांडली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असं अजित पवार पुढे म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे
निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला. जल्लोष झाला नाही. लोकांमध्ये संभ्रम होता असा निर्णय कसा आला. माझ्याकडे एक राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित व्यक्ती आला. तो म्हणाला, “इतना सन्नाटा क्यों है भाई…कोई तो जीता होगा.” याचा अर्थ संघातील लोकांचाही निकालावर विश्वास नाही. खरं पाहिलं तर काही गोष्टींवर विश्वास बसू शकत नाही. मनसेचे आमच्या राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही.
त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळत होती. मात्र आता राजू पाटील यांना एकही मत गावात मिळत नाही. या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही. सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव होतो. अख्खा महाराष्ट्र्ला या निकालावर शॉक बसला आहे. अजित पवार यांच्या चार-पाच जागा येतील, असे वाटत असताना त्यांना ४२ जागा मिळाल्या अन् जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आले त्या शरद पवार यांना दहा जागा मिळतात, असं राज ठाकरे म्हणाले होते. या विधानाला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिल आहे.