Gunaratna Sadavarte : ‘राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा’; गुणरत्न सदावर्तेंची मागणी
Gunaratna Sadavarte : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तेंनी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे.

Gunaratna Sadavarte : आज मुंबईत ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरोधात गर्जना मोर्चा पार पडला. या मोर्चातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एसआयआर प्रक्रिया, केंद्रीय निवडणूक आयोगासह विविध मुद्यावरून केंद्र सरकारला घेरले.
या मोर्चाला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. दोन्ही पक्षातील महत्वाचे नेते या मोर्चाला उपस्थित होते. ठाकरेंचा मोर्चा संविधानविरोधी, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हणत प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तेंनी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले “राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर आहे, ठाकरेंचा मोर्चा संविधानविरोधी, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. संविधानाचे मुखपृष्ठ दाखवायचं आणि बेकायदा मोर्चा काढायचा, हे गैर आहे, चुकीचे आहे. मुंबई पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या जोडबळीला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक करावी.”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? अनुसूचित जातीचा मोर्चा असेल तर गुन्हा दाखल होतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आभाळातून आले का, असे सवालही गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केले.
उद्धव ठाकरेंचा इशारा
“हा लढा कोणत्याही एका पक्षाचा, व्यक्तीचा, जातपात, धर्माचा नाही, हा लढा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. पहिल्यांदा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी ‘मेक इन इंडिया’ अशी घोषणा दिली होती. आम्हाला मान्य आहे, पण त्यामध्ये हुकूमशाह देखील आपल्या देशात बनत असेल तर त्याला या देशातच गाडून टाकण्यासाठी आज आम्ही उभे राहिलेलो आहोत.” अशा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या
मोर्चात केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी दोन मोठ्या मागण्या करत केंद्र सरकारला चॅलेंज केले आहे. एसआयआर प्रक्रिया रद्द केली पाहिजे आणि ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर मतदार घेतले पाहिजे.
Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले….






