पुण्यात पावसाचा तांडव; शाळांनाही सुट्टी, जिल्ह्यातील ‘अपडेट’ जाणून घ्या’ एका क्लिकवर’

पुणे । राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे. सिंहगड रोड संकुलातील अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, आजही पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत. मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील ‘अपडेट’ जाणून घ्या’ एका क्लिकवर’
– एनडीआरएफच्या पथकांना पाचारण, बोटीही बचाव कार्यात दाखल
– नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
– एकता नगर भागातील मदत कार्याचाही अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
– पाणी असलेल्या सखल भागातील *नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा सूचना.
– उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात, मदत कार्याला गती देण्याचे निर्देश
– पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त
– विद्युत धक्का लागल्याने नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू
– पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
– खासगी कार्यालये यांना सुट्टी जाहीर





