Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबई, पुणेसह उपनगरात ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहे. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकरी हतबल कोकण, मुंबई नाशिक आणि धुळेसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट आणि हाय अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मराठवाड्यात आजही पावसाचा दिला आहे. दिवाळीनंतरही राज्यात पाऊस सुरू असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. अतिवृष्टी, रोगकिडी आणि आता अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. Maharashtra Rain Update | आज मुंबई आणि उपनगरासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. Maharashtra Rain Update | ५ नोव्हेंबरपर्यंत पाऊस दुसरीकडे, आंध्रप्रदेशात मोंथा चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. या वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पाऊस पडत आहे. दरम्यान, समुद्रातील कमी दाब क्षेत्रांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र पावसाचा जोर ओसरला असला तरी येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.Maharashtra Rain Update | हेही वाचा : “त्याने मला ४ ऑक्टोबरला….”; रोहित आर्याविषयी मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा म्हणाली “मला जो काही सीन सांगितला तो…”