किवळेत झाडावर वीज कोसळली तर चिंचवडमध्ये झाड पडले..

Updated On:

पिंपरी (प्रतिनिधी) – अवकाळी पावसाने सलग दुसऱ्यादिवशी गुरुवारी (दि. 18) शहरात हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजता सोसाट्याचा वारा वाहू लागल्यानंतर पावसाने हजेरी लावली. यादरम्यान देहूरोडनजीकच्या किवळे, विकासनगरमध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे या झाडाने पेट घेतला. तर दुसऱ्या घटनेत चिंचवडमधील काकडे पार्कमध्ये झाड पडल्याचे वृत्त आहे.

सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. याशिवाय आंदर मावळात गारांचा पाऊस झाल्याने, पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार बुधवारी तुरळक प्रमाणात
शहराच्या विविध भागांत अवकाळीने हजेरी लावली.

तर गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच वातावरण ढगाळ झाले होते. त्यानंतर सोसाट्याचा वारा वाहायला सुरुवात झाली. त्यानंतर अवकाळीने शहर व परिसरात हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

अवकाळीमुळे वातावरणातील गारठा वाढला आहे. पुढील दोन ते तीन दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, मध्यम व हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवमाना विभागाने वर्तविला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad: शहरातही भात झोडणीला वेग; शेतकामासाठी मजूर मिळणे अवघड

2026-11-22 08:03:10

Pimpri-Chinchwad: शहरातही भात झोडणीला वेग; शेतकामासाठी मजूर मिळणे अवघड

Pimpri-Chinchwad: अखेर भाजपाने स्वीकृत नगरसेवकांची नावे केली जाहीर

2026-11-21 10:24:09

Pimpri-Chinchwad: अखेर भाजपाने स्वीकृत नगरसेवकांची नावे केली जाहीर

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये भारत सीरीज; अंतर्गत २४, ९६५ वाहनांची नोंदणी

2026-11-19 07:41:15

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये भारत सीरीज; अंतर्गत २४, ९६५ वाहनांची नोंदणी

Pimpri-Chinchwad: कच्‍च्‍या मालाच्‍या दरवाढीने बिघडतेय उद्योगांचे गणित; गेल्‍या तीन महिन्‍यांत दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

2026-11-18 09:41:11

Pimpri-Chinchwad: कच्‍च्‍या मालाच्‍या दरवाढीने बिघडतेय उद्योगांचे गणित; गेल्‍या तीन महिन्‍यांत दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

Pimpri-Chinchwad : धुळीने माखले पिंपरी-चिंचवड शहर; हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

2026-11-17 08:06:55

Pimpri-Chinchwad : धुळीने माखले पिंपरी-चिंचवड शहर; हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर