Delhi Rain : दिल्लीतही जोरदार पाऊस; झाडे उन्मळली

दिल्ली : दिल्लीमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने (IMD) यापूर्वीच राजधानीत पावसाचा अंदाज वर्तवला होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या बातम्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. या बदलत्या हवामानामुळे एकीकडे नुकसान झाले असले, तरी दुसरीकडे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत पाऊस नुकताच सुरू झाला असला, तरी दक्षिण भारतात पावसाने आधीच अनेक भागात पूरस्थिती निर्माण केली आहे. बेंगलुरूत रविवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत सुमारे १२ तासांत १३० मिमी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला, ५०० घरांमध्ये पाणी शिरले आणि २० हून अधिक तलाव उद्ध्वस्त झाले. हवामान विभागाने बेंगलुरूसाठी ऑरेंज अलर्ट आणि कर्नाटकातील विविध भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
#WATCH | Delhi received gusty winds, heavy rainfall and hailstorm. Visuals from Pandit Pant Marg. pic.twitter.com/5ZFeZTf2HJ
— ANI (@ANI) May 21, 2025
बेंगलुरूत पावसानंतर पूरस्थिती निर्माण होणे आता सामान्य बाब झाली आहे. जलमय रस्ते आणि घरांमध्ये पाणी शिरणे येथे नेहमीचेच झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, बेंगलुरूची ड्रेनेज व्यवस्था केवळ जुनीच नाही, तर सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यास असमर्थ आहे. कर्नाटक सरकारने वर्ल्ड बँकेकडून मागितलेले ५,००० कोटी रुपयांचे कर्ज मजबूत ड्रेनेज पायाभूत सुविधांसाठी वापरले पाहिजे. अशी मागणी होत आहे.





