Rain update – राज्यासह छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत पावसाने हाहाकार केला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफची टीम नागरिकांच्या मदतीला धावून गेली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ढगफुटी सुदृश्य पावसाने काही क्षणात हाहाकार केला आहे. मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे दिसत आहे. करमाड, छत्रपती संभजीनगर तालुक्यातील १५ ऑगस्ट दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे कूबेर गेवराई, बनगाव, जयपुर, वरझडी परिसरात झालेल्या पावसाने लाहूकी नदीला मोठा पूर आला. या पूराचे पाणी कूबेर गेवराई, बनगाव येथील अनेक घरात शिरल्याने नुकसान झाले. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी शेती खरडून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळालं. चांदूरबाजारच्या माधान गावात अनेक घरात पाणी शिरल्याने गावात एनडीआरएफची टीम दाखल झाली. एनडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी तातडीने दाखल झाली. ढगफुटी सदृश्य पावसाने माधान गावातील अनेक घर जमीनदोस्त झाली आहेत. अनेक घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने गृपयोगी साहित्य आणि अन्न धान्याचे मोठे नुकसान झाले आहेत. नांदेडात भिंत कोसळून दाम्पत्य ठार नांदेडममध्ये पती -पत्नीच्या अंगावर भिंत कोसळून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. नांदेडमधील विविध भागांमध्ये संततधार सुरू आहे. यामुळे घरातील कच्च्या मातीची भिंत कमकुवत झाली. यामुळे रात्री सतत पडणाऱ्या पावसामुळे भिंत कोसळली आणि जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. शेख नासेर शेख आमीन आणि त्यांच्या पत्नी शेख हसीना शेख नासेर यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हे जोडपं नांदेडच्या कंधार तालुक्यातील कोटबाजार गावातील रहिवासी होते.