पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शहरातील भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर (डेक्कन), संगम पूल पुलासमोरील वस्ती, कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी , होळकर पूल परिसर या परिसराला पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी अशा सूचना कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहे.
हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.





