Delhi Weather | मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच दिल्लीत पाऊस; तापमानात मोठी घट

Delhi Weather | दिल्ली-एनसीआरमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच शनिवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे तापमानात घट नोंदविली आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, दिल्लीत आज दिवसभर मध्यम पावसासह ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली व्यतिरिक्त उत्तर भारतातील बर्याच भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा परिणाम दिसून येत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमध्ये बर्फामुळे थंडी वाढली आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात हिमस्खलन झाले, ज्यात काही लोक अडकले आहेत, तर काही लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. त्याचवेळी, हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये सतत पावसामुळे भूस्खलन होत आहे, ज्यामुळे बरेच रस्तेही खचले आहेत. याशिवाय प्रशासनाने नद्या व नाल्यांच्या आसपास राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. Delhi Weather |
#WATCH | Rain lashes several parts of the national capital, Delhi.
(Visuals from Teen Murti) pic.twitter.com/RqCKzWIKZK
— ANI (@ANI) March 1, 2025
तापमानात आणखी घट होण्याची शक्यता
हवामान विभागानुसार, आज दिवसभर दिल्ली आणि आसपासच्या भागात ढगाळ वातावरण असेल. तर काही ठिकाणी हलका पाऊसही पडण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त तापमान 22 डिग्री सेल्सियस असेल तर किमान तापमान 13 डिग्री सेल्सियस पर्यंत अंदाजे आहे. तसेच पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात आणखी घट होईल. मागील महिन्यात दिल्लीत चांगलीच थंडी होती. यातच आज पहाटे दिल्लीत पावसालाही सुरुवात झाली आहे. Delhi Weather |
आयएमडीच्या मते, रविवारी आणि सोमवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, डोंगराळ भागात हिमवर्षाव सुरूच राहील, ज्यामुळे अधिक थंडी जाणवेल. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, यावेळी मार्चच्या सुरुवातीच्या काळात थंडीचा परिणाम पूर्वीपेक्षा जास्त जाणवू शकतो. परंतु याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. मात्र राज्याच्या अनेक भागात हवामान गरमच असेल सोबतच वातावरण ढगाळ असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा:





