Srilanka Cyclone Ditwah | श्रीलंकेमध्ये ‘दित्वाह’ चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे श्रीलंकेत हाहाकार उडाला आहे. वादळामुळे श्रीलंकेतील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळाच्या तडाख्यात 56 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण बेपत्ता आहेत. या वादळाचा परिणाम भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर दिसणार असल्यामुळे, हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि केरळ या राज्यांसाठी हाय-अलर्ट जारी केला आहे. विशेषतः उत्तर तमिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश च्या किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. Srilanka Cyclone Ditwah | भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ ३० नोव्हेंबर रोजी तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी चेन्नई शहरात अति-जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. Srilanka Cyclone Ditwah | . मासेमारीसाठी न जाण्याचा स्पष्ट इशारा याशिवाय केरळ आणि लक्षद्वीप परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळामुळे विविध किनारी भागांमध्ये ताशी 60 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील रविवारपर्यंत समुद्रामध्ये मासेमारीसाठी न जाण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. आधीपासून समुद्रात असलेल्या बोटींना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.Srilanka Cyclone Ditwah | काय आहे ‘दित्वाह’चा अर्थ? बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे या वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. या वादळाला ‘दित्वाह’ नाव दिले आहे. ‘दित्वाह’ या शब्दाचा अर्थ ‘खाडी’ असा आहे. हे नाव यमन या देशाने, वादळांना नाव देण्याच्या नियमांनुसार सुचवले होते. यमनच्या सोकोट्रा बेटावर असलेल्या ‘दित्वाह खाडी’च्या नावावरून या वादळाला ‘दित्वाह’ असे नाव देण्यात आले आहे. Srilanka Cyclone Ditwah | हेही वाचा : “मी ठरवले की,…”; ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; चाहत्यांना धक्का, नेमकं कारण काय?