पुढील काही दिवस पावसाचे…! अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात, ‘या’ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Update | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मान्सून पूर्व पावसाचा वेग वाढल्याने अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. संध्याकाळच्या वेळेत पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडत आहे. मात्र वाढत्या उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला आहे.
रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी जारी करण्यात आला आहे. काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा
दुसरीकडे, महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याचा राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नाही, पण याचा समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update |
तीन ते चार दिवस काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २२ ते २४ मे पर्यंतच्या तीन दिवसात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी ह्या ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी ह्या जिल्ह्यात तर ह्या जोरदार पावसाचा जोर २६ मे पर्यंत राहू शकतो.
शेतीचे नुकसान
भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसलाय तो पवनी तालुक्यातील पहेला परिसरातील शेती पिकाला. वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधील भातपीक भुईसपाट झालं. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याने याचा मोठा फटका रब्बी हंगामातील धान्य पिकाला बसला आहे. अमरावतीत पावसामुळे संत्रा, कांदा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. Maharashtra Rain Update |
हेही वाचा:





