Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (Rain Alert) राज्यात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, उर्वरित महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली आहे.

Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (Rain Alert) राज्यात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, उर्वरित महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यात मान्सून (Rain Alert) पुन्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय झाल्याने पुढील ४ ते ५ दिवस विविध भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी राज्यातील हवामानाबाबत (Rain Alert) सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, २५ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहील. विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येथे ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे (Rain Alert) राज्यातील प्रमुख धरणे भरण्यास मदत होणार आहे. पावसाचे आगमन झाले असले तरी शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरणी न करता, कृषी तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊनच पेरणी करावी, असे आवाहन सानप यांनी केले आहे. तसेच हवामानाच्या अचूक आणि ताज्या माहितीसाठी नागरिकांनी भारतीय हवामान विभागाच्या ‘मेघदूत’ अॅपचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. अरबी समुद्राकडून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत असल्याने कोकण भागात पावसाचा जोर अधिक वाढला आहे. कोकणातील किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असून, येत्या पाच दिवसांत या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे किनारपट्टी भागात ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या काही तासांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे (Rain Alert) कोकणातील काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्या पात्राबाहेर वाहण्याची आणि किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि नदीकाठच्या रहिवाशांना योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.






