Railway Block – दौंड-मनमाड दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणे रेल्वे विभागातील अकोलनेर-अहिल्यानगर-निंबळक विभागांमध्ये प्री-एनआय आणि नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. १५ ते १९ मे दरम्यान पुणे-नागपूर-पुणे, पुणे-गोरखपूर विशेष, पुणे-दानापूर-पुणे आणि पुणे-जबलपूर या प्रमुख गाड्या रद्द करण्याबरोबरच काही गाड्यांच्या मार्गात आणि वेळेत बदल करण्यात आले आहे. तरी प्रवाशांनी बदलाची माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुण्यातून सुटणाऱ्या आणि पुण्यात येणाऱ्या काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये हडपसर-नांदेड-हडपसर एक्सप्रेस (दि. १५, १६, १७ मे) दौंड-कुर्डुवाडी-लातूर रोड-परभणी-पूर्णा-नांदेड मार्गे वळवण्यात येईल. पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेस (दि. १६, १७, १८ मे) पुणे-दौंड-कुर्डूवाडी-लातूर रोड-परभणी-पूर्णा-अकोला-अमरावती मार्गे वळवण्यात आली आहे. निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस (दि. १५, १६, १७ मे) निजामाबाद-जनकपेट-पूर्णा-परभणी-लातूर रोड-कुर्डूवाडी-दौंड मार्गे तर दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस (दि. १६, १७ मे) दौंड-कुर्डूवाडी-लातूर रोड-परभणी-पूर्णा-जनकंपेत-निजामाबाद मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस (दि. १५ मे), जम्मू तवी-पुणे एक्स्प्रेस (दि. १४, १५, १६ मे), पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस आणि यशवंतपूर- चंदीगड एक्स्प्रेस (दि. १६ मे), पुणे-हटिया एक्स्प्रेस आणि अजनी-पुणे एक्स्प्रेस (दि. १७ मे), बनारस-हडपसर एक्स्प्रेस (दि. १५, १६ मे) तर हडपसर-बनारस एक्स्प्रेस (दि. १६, १७, १८ मे) या गाड्या पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-इगतपुरी-नाशिक रोड-मनमाड मार्गे ये-जा करणार आहेत. दरम्यान, दि. १५ मे रोजी दानापूर-हडपसर स्पेशल गाडीचे तीन तासांसाठी नियमन केले. दि. १५ आणि १६ मे रोजी निजामुद्दीन-वास्को एक्सप्रेसचे दीड तासासाठी नियमन केले आहे. गाझीपूर सिटी-हडपसर स्पेशल दि. १७ मे रोजी गाझीपूर सिटीहून चार तास उशिराने सुटेल. पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस दि. १८ मे रोजी पुण्याहून अर्धा तास उशिरा सुटणार आहे