प्रभात वृत्तसेवा वाठार स्टेशन – तडवळे (ता. कोरेगाव) हद्दीत पहाटेच्या सुमारास रेल्वे खाली सापडून कर्नाटकातील परप्रांतीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. गिरीशकुमार वराप्पा सोलापुरे (वय अंदाजे ३२, रा. वराप्पा कबर माळ, बेळगाव, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साधारण २.१५ वाजण्यापूर्वी वाठार ते सालपे जाणाऱ्या रेल्वे अप लाईनवरील किमी ११६/१२ येथे एका व्यक्तीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता गिरीशकुमार सोलापुरे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याचे तसेच दोन्ही पाय मांडीतून तुटलेले असल्याचे आढळले. अपघात रात्रीच झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त असून सदर घटनेची फिर्याद रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये नोकरीस असलेल्या अशोक मारूती हजारे (वय ५८, रा. सातारा) यांनी वाठार पोलिसात दिली.या प्रकरणी पुढील तपास पोहवा साबळे करत आहेत.