टेरेसवरुन पूर पाहताना गेला तोल, पाण्यात पडून एकाचा मृत्यू
Updated On:

रायगड – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबईसारखे शहर पावसामुळे जलमय झाले. पावसाच्या पाण्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जिवीतहानी झाल्याचे बघायला मिळाले आहे. महाड शहरात सुद्धा मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून पुराचा पहिला बळी गेला आहे.
५० वर्षीय व्यक्तीचा टेरेसवरुन पुर पाहताना तोल गेला त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाड शहरात घडली आहे. संजय नारखेडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. महाडमधील खासगी रुग्णालयात संजय नारखेडे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.





