रायगड : रायगडमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. कणघर गावा जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
कसा झाला अपघात?
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणेरे श्रीवर्धन मार्गावर भरधाव येणारी कार झाडाला आदळली आणि नंतर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.