जर्मनीत करातील गैरव्यवहार प्रकरणी देशभरात छापे

बर्लिन – जर्मनीमध्ये करातील गैरव्यवहारप्रकरणी देशभरात किमान 19 ठिकाणी छापे घातले आहेत. “कम एक्‍स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गैरव्यवहारप्रकरणातून हे छापे घातले गेले असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरात किमान 181 तपास अधिकारी आणि कर अध्काऱ्यांनी हे छापे घातले. त्यामध्ये अनेक कार्यालये आणि खासगी व्यक्‍तींच्या घरांचाही समावेश आहे. हेस्सन, लोअर सॅक्‍सोनी, बाडेन वुएर्थम्बर्ग आणि वावारिया या ठिकाणी मंगळवारी हे छापे घातले गेले, असे फ्रॅंकफर्टच्या सरकारी वकिलांनी सांगितले. एकूण सात संशयित व्यक्‍तींशी संबंधित असलेल्या या कर गैरव्यवहार प्रकरणामध्ये 2007 ते 2011 या कालावधीमध्ये 50 दशलक्ष युरो (56 दशलक्ष डॉलर) इतका मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय आहे. या गैरव्यवहारामध्ये अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या दैनंदिन लाभाच्या प्रकरणांचा समावेश आहे. या कंपन्यांची मालकी अनेक व्यक्‍तींकडे हस्तांतरित केली गेली असल्यामुळे या प्रकरणामध्ये एकापाठोपाठ अनेक व्यक्‍तींचा सहभाग वाढत गेला आहे.

या प्रकरणात 2001 पासून संपूर्ण जर्मनीमध्ये 7.2 युरो (8.2 अब्ज डॉलर), डेन्मार्कमध्ये 1.7 अब्ज डॉलर आणि बेल्जियममध्ये 201 दशलक्ष डॉलरचा गैरव्यवहार आहे. जर्मनीतील प्रसिद्ध वकिल हन्नो बर्जर हा या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टर माईंड असल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.