रेड 2 चा बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ! १० दिवसात इतक्या कोटींची कमाई; जाट, केसरी 2 ला दिली टक्कर, आकडे पाहा…

Raid 2 movie box office collection : अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला रेड २ हा चित्रपट १ मे २०२५ रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. गेल्या १० दिवसांपासून या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर अक्षरक्ष: धूमाकूळ घातला आहे. याच दरम्यान रिलीज झालेल्या अक्षय कुमारचा केसरी २ आणि सनी देओलच्या जाटला मागे टाकत अवघ्या १० दिवसांत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रेड २ ने १९.२५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी १२ कोटी, तिसऱ्या दिवशी १८ कोटी, चौथ्या दिवशी २२ कोटी, पाचव्या दिवशी ७.५ कोटी, सहाव्या दिवशी ७ कोटी, सातव्या दिवशी ४.७५ कोटी, आठव्या दिवशी ५.२५, नवव्या दिवशी ५ कोटी, दहाव्या दिवशी ८.२५ कोटींची कमाई करत १०८.७५ कोटींची भरगच्च कमाई केली आहे. तर जगभरातून या चित्रपटाने १३७.८ कोटींची कमाई केली आहे.
रेड २ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगण याच्यासोबत रितेश देशमुखने स्क्रीन शेअर केली आहे. रितेश हा रेड २ मध्ये एका वेगळ्या आणि नेगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये असल्याने प्रेक्षकांची रेड २ ला पसंती मिळाल्याचे सांगितले जात आहे. रेड २ सोबत केसरी २ आणि जाट हे तारखांच्या फरकाने रिलीज झाले होते. या चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असला तरी त्यामानाने रेड २ ला कमाईच्या बाबतीत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.





