नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर कॉंग्रेस पक्षाच्या मागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. पक्षाला नेतृत्व नाही आणि त्यातच आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. मात्र, आता यासर्व परिस्थितीमध्ये प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. त्यासाठी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.
देशसेवेसाठी कोणत्याही पक्षाला किंवा एखाद्या व्यक्तीला पदाची गरज नसल्याचे सांगत वाड्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी समर्थन दिले आहे. तसेच वाड्रा यांनी राहुल गांधी यांच्याविषयी लिहिताना म्हटले, राहुल मला तुमच्याकडून खुप काही शिकण्यास मिळाले. देशातील 45 टक्के तरूण अजूनही आपल्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत आहेत. तसेच तुम्ही देशातल्या जनतेशी जोडले गेले आहात त्यामुळे तुुमच्या या जनसेवेला कोणत्याही पदाची गरज नाही असेही त्यांनी म्हटले.