कॉंग्रेसमधील व्यापक फेरबदलांसाठी राहुल यांना फ्री हॅंड मिळावा

पक्षनेत्याची मागणी: कार्यकारिणी सदस्यांना राजीनामा देण्याचे आवाहन

हैदराबाद- सलग दोन लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाल्यानंतर पक्षात व्यापक फेरबदल होण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, त्या फेरबदलांसाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना फ्री हॅंड मिळायला हवा, अशी भूमिका पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्री शशिधर रेड्डी यांनी मांडली आहे.

कॉंग्रेसमध्ये व्यापक फेरबदल करण्याचा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केला. ती प्रक्रिया वरच्या स्तरावरून सुरू व्हायला हवी. त्यासाठी कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्यांनी आणि महासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला हवेत, असे रेड्डी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

देशात कॉंग्रेसला बांधूून ठेवणारी शक्ती म्हणजे गांधी कुटूंब आहे. इतर कुठल्याच नेत्यामध्ये त्या कुटूंबाइतकी सर्वदूर स्वीकारार्हता नाही. त्यामुळे यावेळी बिगर गांधी अध्यक्ष हा विचार निष्फळ ठरेल. पक्षांतर्गत पातळीवर राहुल यांना अधिक ताकद मिळवून देणे आवश्‍यक आहे. तूर्त राहुल यांना पूर्ण मोकळीक असल्याचे वाटत नाही, असेही त्यांनी म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here