राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

Updated On:

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं  पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवड पार पडली.

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केले. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान,  राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं.  भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर  यांना ऐकून १६४ मत मिळाली.

तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना एकूण १०७ मतं मिळाली आहेत. १०० मतं पूर्ण झाल्यानंतर टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं. तीन आमदार तटस्थ राहिले असून यामध्ये समाजवादी पक्ष आणि एमआयएमचा समावेश आहे.

आणखी संबंधित बातम्या

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

2026-08-23 16:05:46

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

2026-08-23 12:04:02

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

2026-08-22 18:47:41

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

Devendra Fadnavis : पोलीस श्वानांचा सेवानिवृत्तीनंतर सर्व खर्च उचलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

2026-08-22 18:11:33

Devendra Fadnavis : पोलीस श्वानांचा सेवानिवृत्तीनंतर सर्व खर्च उचलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Cancellation of Additional Surcharge : गणेशोत्सवासाठी बसच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त अधिभार रद्द

2026-08-21 16:22:46

Cancellation of Additional Surcharge : गणेशोत्सवासाठी बसच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त अधिभार रद्द