पायी चालत निघालेल्या मजुरांना राहुल गांधींचं आश्वासन

नवी दिल्ली – कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत देशव्यापी लॉक डाऊनचे तीन टप्पे लागू करण्यात आले असून चौथा टप्पा देखील येत्या १८ मेपासून लागू करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊन अत्यावश्यक असला तरी यामुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांचे आतोनात हाल होत असल्याचे चित्र सध्या देशभरामध्ये पाहायला मिळतंय. अशातच आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांना सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचा एक व्हिडीओ शेअर आहे.
गांधी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हजारो स्थलांतरित मजूर आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पायी चालताना दिसत आहेत. या मजुरांसोबतच त्यांची तान्ही मुलं, स्त्रिया या देखील पायी प्रवास करताना दिसतायेत. या व्हिडिओसोबतच राहुल गांधी यांनी एक संदेश दिला असून यामध्ये त्यांनी, ‘आम्ही या मजुरांची आर्त हाक सरकारपर्यंत पोहचवून त्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळवूनच देऊ. हे मजूर म्हणजे देशाचा स्वाभिमान असून देशाच्या स्वाभिमानास झुकू देणार नाही.’ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत अभियान या आर्थिक पॅकेजमधील मजूर, शेतकरी, फेरीवाले व्यावसायिक यांच्यासाठीच्या उपाययोजनांबत माहिती दिली असून अर्थमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं असल्याने त्यांना या ट्विटद्वारे सरकारी उपाययोजना तोकड्या असल्याचं म्हणायचं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
अंधकार घना है कठिन घड़ी है, हिम्मत रखिए-हम इन सभी की सुरक्षा में खड़े हैं। सरकार तक इनकी चीखें पहुँचा के रहेंगे, इनके हक़ की हर मदद दिला के रहेंगे। देश की साधारण जनता नहीं, ये तो देश के स्वाभिमान का ध्वज हैं… इसे कभी भी झुकने नहीं देंगे। pic.twitter.com/bBf48DiluY
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 14, 2020





