काय आहे प्रकरण
\nराफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर, अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. यावर भाजपने आक्षेप घेतला होता.