राहुल गांधी यांची अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळाला भेट ! हात जोडून नम्र भावनेने केले नमन

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीमध्ये दिवंगत नेत्यांच्या समाधीस्थळांना भेट दिली. सर्वात आधी राहुल गांधी वीरभूमी येथील राजीव गांधींच्या समाधीस्थळी पोहचले यावेळी त्यांनी राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर राहुल गांधी इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळावर पोहचले आणि त्यांनी इंदिराजींना श्रद्धांजली अर्पण केली. विशेष म्हणजे अतिशय साध्य पोषाखामध्ये नम्रपणे राहुल गांधीं यावेळी समाधीस्थळी नतमस्तक झाल्याचे दिसून आले.
यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शांतीवन येथील समाधी स्थळी राहुल गांधी पोहचले आणि त्यानंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राष्ट्रीय स्मृती स्थळी देखील राहुल गांधी गेले. याठिकाणी जाऊन राहुल गांधी यांनी अटलजींच्या स्मृतीस नमन केले. सध्या राहुल गांधींनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा दिल्लीमध्ये आहे.
Delhi | Congress MP Rahul Gandhi pays tributes to Former PM Atal Bihari Vajpayee at Sadaiv Atal. pic.twitter.com/HyYaKOKRDk
— ANI (@ANI) December 26, 2022
२ जानेवारीपर्यंत यात्रा स्थगित
भारत जोडो यात्रा आता पुढील 9 दिवस बंद राहणार आहे. त्यानंतर 3 जानेवारीपासून ही यात्रा उत्तर प्रदेशातून सुरू होईल आणि तीन जिल्ह्यांतुन मार्गक्रमण करेल. भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी सीमेवरून प्रवेश करेल. यानंतर 4 जानेवारीला बागपत, 5 जानेवारीला शामली आणि 6 जानेवारीला कैराना मार्गे जाऊन दुसऱ्या टप्प्यात हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात प्रवेश करेल. तेथून पंजाब आणि जम्मू-काश्मीरला रवाना होईल.





