Rahul Gandhi : अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”
Rahul Gandhi :राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती याठिकाणी विमान अपघातात निधन झाल आहे.

Rahul Gandhi : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती याठिकाणी विमान अपघातात निधन झाल आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. दरम्यान , त्यांच्या निधनावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे. Rahul Gandhi :
अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजित पवार जी और उनके सहयात्रियों की आज हवाई जहाज दुर्घटना में निधन का समाचार अत्यंत पीड़ादायक है।
इस शोक के पल में महाराष्ट्र की जनता के साथ हूं। समस्त पवार परिवार और प्रियजनों को इस दुख की घड़ी में अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 28, 2026
यामध्ये त्यांनी ,”महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आज विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या क्षणी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.” असे म्हटले आहे.
दरम्यान , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे. Rahul Gandhi :





