Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजेरी झाले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या विधानावरून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. महात्मा गांधी हत्येमागे आरएसएस या संघटनेचा हात असल्याचे विधान राहुल गांधींनी (Rahul Gandhi )केलं होतं. त्याविरोधात आरएसएस संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज शनिवारी सुनावणी होणार असून राहुल गांधी जामिनासाठी भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. या प्रकरणाची सुनावणी गेली ९ वर्षे सुरू असून या प्रकरणात राहुल गांधी यांना यापूर्वी जामीन मंजूर झाला होता. मात्र, त्यावेळी जामीनदार असलेले शिवराज पाटील यांचं निधन झाल्यामुळे आता त्यांना नव्याने जामीनदार सादर करावा लागणार आहे. Rahul Gandhi: PM Modi Israel Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसाच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार ; मोठ्या कराराची अपेक्षा काय आहे प्रकरण? शनिवारी भिवंडी न्यायालयात येत असल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील अड .नारायण अय्यर यांनी दिली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आरोपी राहुल गांधी यांनी सोनाळे गावात निवडणूक सभेत महात्मा गांधींच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचं विधान केलं होतं. संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी संघाच्या बदनामी झाल्याबद्दल भा. दं. सं. कलम 500 प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती. Rahul Gandhi दरम्यान, सदर केसमध्ये राहुल गांधी यांना जामीन देणारे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्यानं त्यांच्या जागी नवीन जामीन देण्यासाठी राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात येत आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना आतापर्यंत तीन वेळा भिवंडी न्यायालयात हजर रहावे लागले आहे. Rahul Gandhi दरम्यान, आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तर राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले हेही वाचा: Top 10 news: नारायण राणेंविरोधात मानहानीचा दावा, राज्यावर अवकाळीचं संकट,अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर