Rahul gandhi : रामलीला मैदानातील सभेपूर्वी राहुल गांधींचं मोठं विधान ; भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
Rahul gandhi : दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

Rahul gandhi : दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. विद्यार्थी, शेतकरी, मजूर, महिला, तरुण आणि व्यापाऱ्यांसह लोकशाहीची काळजी असलेल्या प्रत्येकाने या रॅलीत सहभागी होण्यासाठी दिल्ली गाठावी, असे त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचा प्रचार केल्याबद्दल राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचे उपरोधिक शब्दांत आभार मानले आहेत.
राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदार यादीतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. ‘आमच्या मताची चोरी होत आहे आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत शांतपणे सहन करणार नाही,’ असे त्यांनी म्हटले.
मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याचा आरोप करताना नियम आणि कायदे मोडीत काढले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठीमार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
१ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये जनमोर्चा आणि मेगा रॅली Rahul gandhi :
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमधून १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या जनमोर्चा आणि मेगा रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘मत वाचवा, देश वाचवा’ हा या आंदोलनाचा मुख्य संदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही आणि मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हमारा वोट चुराया जा रहा है और ये हम किसी हाल में चुपचाप नहीं सहेंगे।
मतदाता सूचियों से नाम काटे गए। नियम-कानून तोड़े गए। और सवाल पूछने वालों पर लाठियां चलीं।
अब जवाब देश देगा।
1 नवंबर – चलो दिल्ली।
वोट बचाओ – देश बचाओ जन मार्च और महारैली।छात्र, किसान, मज़दूर, महिलाएं, नौजवान और व्यापारी – जिस-जिस को लोकतंत्र की फ़िक्र है, वो ज़रूर आए।
वोट आपका है। लड़ाई भी आपकी है।
📍 रामलीला मैदान, नई दिल्ली
PS: BJP और उसके साथियों का दिल से धन्यवाद, जो इस कार्यक्रम का इतना ज़ोर-शोर से प्रचार कर रहे हैं और इसे ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचा रहे हैं।
बस अगले 7 दिन भी यही जोश और लगन बनाए रखिए!
#ChaloDilli
#RamlilaMarch— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2026
भाजपचे आभार मानत राहुल गांधींचा टोला Rahul gandhi :
या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाचा त्यांनी उत्साहाने प्रचार केला आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला, असे राहुल गांधी यांनी म्हटले. भाजपवर टीका करतानाच त्यांनी केलेल्या प्रचाराचा उल्लेख करून राहुल यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.
पुढील सात दिवसही असाच उत्साह आणि समर्पण कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी, शेतकरी, मजूर, महिला, तरुण आणि व्यापाऱ्यांसह लोकशाहीची चिंता असलेल्या प्रत्येकाने या रॅलीत सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले.
मतदारांच्या अधिकारांचा मुद्दा केंद्रस्थानी
मतदार यादीतील कथित अनियमितता आणि मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने या रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भाजपविरोधात भूमिका मांडण्याची तयारी केली आहे. राहुल गांधी यांच्या आवाहनामुळे १ नोव्हेंबरच्या रॅलीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सभेत काँग्रेसकडून मतदार यादी, कथित मतचोरी आणि लोकशाहीच्या रक्षणासंदर्भात कोणते मुद्दे मांडले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





