स्वामी विवेकानंदांच्या पुण्यतिथीनिमीत्त राहुल गांधींनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी स्वामी विवेकानंदांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. यानिमीत्त दिलेल्या संदेशात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की विवेकानंद यांनी संपूर्ण जगाला निर्भयतेची शिकवण दिली. त्यांनी करुणेचा मार्ग दाखवला आणि बंधुभावाची शिकवण दिली, असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ट्विटरवरून विवेकानंदांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी भारतीय सभ्यता आणि संस्कृती जगभर प्रसिद्ध केली.त्यांनी म्हटले आहे की, भारतीय सभ्यता आणि संस्कृतीला जगभरात पोहचवणारे महान विचारवंत आणि तरुणांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांना लाखो प्रणाम. आपल्या ट्विटमध्ये खर्गे यांनी विवेकानंदांच्या शिकागोच्या धर्म संसदेतील भाषणाचे काही उतारे दिले, जे आजही अतिशय समर्पक असल्याचे त्यांनी सांगितले.





