VIDEO : महिन्याला आठ लाख कमावतो.. अमेरिकेतील ट्रक चालकाचा पगार ऐकून राहुल गांधी सुद्धा झाले अवाक

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी भारतात ट्रक ट्रकने प्रवास करत ड्रायव्हरशी संवाद साधला होता. आता राहुल गांधींनी अमेरिकेत देखील ट्रकने प्रवास करण्याचा आनंद घेतला आहे. यावेळे देखील त्यांनी ट्रक चालकाच्या जीवनाबाबत माहिती घेतली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये भारत आणि अमेरिकेतील ट्रक चालकांच्या स्थितीतील फरक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी राहुल गांधींनी ट्रक चालकाला त्याच्या कमाईबद्दल विचारले. ट्रकचालकाने दिलेले उत्तर ऐकून राहुल गांधी अवाक् झाले.यावेळी राहुल गांधींनी वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क असा १९० किलोमीटरचा प्रवास केला.
राहुल गांधी ज्या ट्रकमध्ये बसले होते तो ट्रक भारतीय वंशाचा तेजिंदर गिल चालवत होता. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अमेरिकेतील ट्रक अत्यंत आधुनिक आहे. यावेळी राहुल गांधी भारतातील ट्रक मात्र असे नसल्याचे म्हणताना दिसत आहेत.
“कितना कमा लेते हो?”
“कुछ गाने बजा लें? सिद्धू मूसेवाला के?”
“हम ट्रक वालों के कारण ही मैन्युफैक्चरर्स का काम चलता है।”
अमेरिका में एक भारतीय ड्राइवर के साथ ट्रक यात्रा, उनके अनुभव और कहानियां!
पूरा वीडियो यूट्यूब पर:https://t.co/AxWYEHoka7 pic.twitter.com/KQ8OJq8Vrg
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 13, 2023
राहुल गांधींसोबतच्या संभाषणात ड्रायव्हर तेजिंदर गिल म्हणाले, ‘इथे पोलीस कधीच त्रास देत नाहीत. चोरीची भीतीही कमी आहे. होय, जास्त खर्च केल्यावर चलन कापले जाते. वेगमर्यादा राज्यानुसार आणि ठिकाणाहून बदलते. तसेच यावेळी ड्रायव्हर सांगतो, ड्रायव्हिंग करून इथं चार पाच लाख रुपये आरामात कमावता येतात. आठ दहा हजार डॉलर म्हणजेच आठ लाख रुपये येथील ड्राइव्हर कमावू शकतो. यावर अवाक होऊन राहुल गांधी ड्रायव्हरला पुन्हा विचारतात आठ लाख रुपये. राहुल यांच्या या प्रवासाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.





