राहुल गांधींनी हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांना दिले ‘हे’ वचन ; कुटुंबीय म्हणाले,”आम्हाला…

Rahul gandhi in hathras । काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. राहुल गांधी आज सकाळीच अलिगडमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी पिलखाना गावात लोकांची भेट घेतली. बैठकीनंतर पीडितेच्या कुटुंबाला पक्षाच्यावतीने मदत करणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिलं.
सर्वतोपरी मदतीचे आश्वासन Rahul gandhi in hathras ।
यावेळी राहुल गांधी यांनी,”आम्ही पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत तुम्हाला करू” असे पीडित कुटुंबियांना म्हटले. त्यांनी अजून कोणती मदत करणार हे सांगितले नाही पण संपूर्ण मदत करणार असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले. पुढे राहुलने आम्हाला विचारले काय झाले, कसे झाले… घटना घडली. तेव्हा प्रशासन घटनास्थळी नव्हते का ? असे त्यांनी विचारले असल्याचे पीडित कुटुंबीयांनी म्हटले.
काँग्रेसने सोशल मीडियावर लिहिले की, “आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
6 जणांना अटक Rahul gandhi in hathras ।
उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सेवेकरीवर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
अलिगड विभागाचे पोलिस महानिरीक्षक शलभ माथूर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, हरिनारायण साकार विश्वहारी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आतापर्यंत दोन महिला सेविकांना अटक करण्यात आली आहे. हातरसमधील सिकंदरराव परिसरातील फुलराई गावात आयोजित केलेल्या कारवाईत त्याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुख्य सेवेदार देव प्रकाश मधुकर यांच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध लवकरच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येणार आहे.





