‘लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात’ म्हणणाऱ्या फडणवीसांना राहुल गांधींनी दिल सडेतोड प्रत्युत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती. राहुल गांधी ज्या प्रकारची मोट बांधतायत ती महाराष्ट्रासाठी घातक आहे. भारत जोडोमध्ये दीडशे दोनशे संघटना आहेत, यापैकी 100 पैकी जास्त अराजकतावादी संघटना आहेत. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्या समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या संघटना आहेत हे स्पष्ट होते. हे भारत जोडो आंदोलन नाही, तर भारत तोडो आंदोलन आहे. तसेच राहुल गांधी संविधानाच्या नावाने लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिउत्तर दिल आहे.राहुल गांधी यांनी पोस्ट केली आहे की,’महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मते, बाबासाहेबांचे संविधान दाखवून जात जनगणनेसाठी आवाज उठवणे, ही नक्षलवादी कल्पना आहे. भाजपाची ही विचारसरणी म्हणजे संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांचा अपमान आहे, असेही ते म्हणाले आहे.
महाराष्ट्र के भाजपा के पूर्व मुख्यमंत्री के अनुसार बाबासाहेब के संविधान को दिखाना और जाति जनगणना के लिए आवाज़ उठाना नक्सली विचार है! भाजपा की ये सोच संविधान निर्माता महाराष्ट्र के सपूत डॉ भीमराव आंबेडकर का अपमान है।
लोकसभा चुनाव के दौरान महाराष्ट्र की जनता ने संविधान की लड़ाई…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 7, 2024
तत्पूर्वी, सांगली जिल्ह्यातील जतमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते. जतमधील भाजप उमेदवार गोपीचंद पडाळकर यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, तुम्ही संविधनाच्या नावाने लाल पुस्तक का दाखताय? लाल पुस्तकच तुमच्या हातामध्ये का आहे? कुणाला तुम्ही लाल पुस्तकाच्या माध्यमातून इशारा देत आहात. आपल्या समाजाची वीण उद्धवस्त करण्याचे षडयंत्र राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्ष करतोय, असा आरोप त्यांनी केला होता.





