निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना क्लीन चिट
Updated On:

नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधातील वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लीन चिट दिली आहे. राहुल यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा निर्वाळा आयोगाने दिला आहे. मागील महिन्यात एका सभेत बोलताना राहुल यांनी शहांचा उल्लेख हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून केला होता. त्यावरून भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. गुजरातमधील दोन चकमक प्रकरणांत शहा यांना आरोपी करण्यात आले होते. त्याचा संदर्भ राहुल यांनी दिला होता. अर्थात, त्या प्रकरणांतून विशेष न्यायालयाने शहा यांची याआधीच मुक्तता केली. राजकीय कारणांस्तव शहा यांना त्या प्रकरणांत गोवण्यात आल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला होता.





