Rahul Gandhi | राहुल गांधी हाजिर हो….; ‘त्या’ प्रकरणात नाशिकच्या न्यायालयाने दिले प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

Rahul Gandhi | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोप प्रकरणात राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर न राहता प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा, असे निर्देश नाशिकच्या न्यायालयाने दिले आहेत.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वर्धा येथे बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा माफीवीर असा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर सावरकर प्रेमींनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. त्या संदर्भात भावना दुखावल्याने नाशिकमधील सावरकरप्रेमी देवेंद्र भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या न्यायालयात बदनामी फौजदारी दावा दाखल केला.
दरम्यान, शनिवारी राहुल गांधी यांनी उपस्थित राहू शकत नाहीत, असे कारण त्यांचे वकील जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी दिले. मात्र जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे अशी मागणी अर्जदारांनी केली. ती मान्य करण्यात आली. याच वेळी राहुल गांधी यांनी वकिलांमार्फत उपस्थितीबद्दल सवलत देण्याची विनंती केली. तसेच उपस्थितीबाबत कायमस्वरुपी सवलत देण्याची मागणी अर्जाद्वारे केली. Rahul Gandhi |
मात्र कायमस्वरुपी सवलत मिळवण्याची ही वेळ नाही. प्रथम जामीन होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन होऊ शकत नाही, प्रत्यक्ष हजर राहून जामीन घ्यावा लागेल, असे मुद्दे ॲड. पिंगळे यांनी मांडल्यानंतर न्यायालयाने ही बाब मान्य केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार आहे. Rahul Gandhi |
हेही वाचा:





