कोच्ची – माजी क्रिकेटपटू एम सुरेश कुमार यांनी राहत्या घरी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाली 7.10 च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम सुरेश कुमार यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळला. शुक्रवारी सायंकाळी जेव्हा कुमार यांची पत्नी व मुलगा घरी आले तेव्हा त्यांना बेडरूममध्ये कुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
कुमार यांनी 2005 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधू निवृत्ती घेतली होती. राहुल दृविड नेतृत्व करत असलेल्या संघात त्यांनी 1990 ते 91 दशकात 19 वर्षाखालील क्रिकेट संघाकडून खेळले होते.
कुमार संघामध्ये प्रभावी गोलंदाज म्हणून ओळखले जात असत. राहुल दृविड यांनीही त्यांच्या गोलंदाजीचे कोतुक केले होते.
एम सुरेश कुमार हे एक अष्ठपैलू खेळाडू होते. त्यांनी रणजी ट्राॅफीत केरचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारताच्या अंडर 19 संघाकडून त्यांनी न्यूझीलंडविरूद्ध मॅच खेळली होती.
कुमार यांनी 1992-93 मध्ये रणजी ट्राॅफीत पदार्पण केले होते. त्यांनी 2005-06 पर्यंत तब्बत 72 सामने खेळले होते. त्यात त्यांनी 1 हजार 657 धावा आणि 196 विकेट घेतल्या होत्या. कुमार यांनी केरळकडून 52 तर रेल्वेकडून 17 असे एकूण 69 सामने खेळले होते. कुमार हे भारतीय रेल्वेत अधिकारीही होते.