Rahul Dravid Dublin Guardians Owner : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या शिरपेचात आता मानाचा नवा तुरा रोवला गेला आहे. खेळाडू म्हणून देशाला अनेक सामने जिंकवून देणाऱ्या आणि प्रशिक्षक म्हणून भारताला टी-२० विश्वचषक मिळवून देणाऱ्या द्रविड यांनी आता थेट एका क्रिकेट संघाची मालकी स्वीकारली आहे. आयर्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या युरोपीय टी-२० प्रीमियर लीग (ETPL) मधील ‘डब्लिन गार्डियन्स’ या संघाचे द्रविड सह-मालक बनले आहेत. भारतीय कंपनीसोबत ‘डब्लिन गार्डियन्स’वर ताबा – राहुल द्रविड एका भारतीय खासगी कंपनीचा भाग आहेत, ज्या कंपनीने डब्लिन गार्डियन्स संघाचे अधिग्रहण केले आहे. या नव्या भूमिकेबद्दल द्रविड यांनी कमालीचा उत्साह व्यक्त केला आहे. “युरोपमधील क्रिकेटबद्दलची ऊर्जा आणि खेळाडूंची जिद्द मला नेहमीच भावते. टी-२० विश्वचषकातील भारताच्या विजयाने तरुणांना या फॉरमॅटकडे अधिक आकर्षित केले आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आर अश्विन करणार संघाचे नेतृत्व – Rahul Dravid announced the co-owner of the final team for European T20 Premier League. Team called the ‘Dublin Guardians’. Cricket Ireland chair Brian MacNeice said with six teams now confirmed for ETPL it was a “landmark day for European cricket”. More: https://t.co/b1FDH82WEG — Timothy Abraham (@TimothyAbraham) May 11, 2026 विशेष म्हणजे, भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला डब्लिन गार्डियन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अश्विनने डिसेंबर २०२४ मध्ये कसोटी आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याने तो आता जागतिक स्तरावरील लीग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हेही वाचा – Tim David Fined : विजयाचा उन्माद नडला! टिम डेव्हिडच्या ‘त्या’ अश्लील इशाऱ्यामुळे बीसीसीआयचा मोठा दणका अभिषेक बच्चन यांची नवी लीग – बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हे ‘रुल्स स्पोर्ट टेक’ या भारतीय कंपनीच्या सहकार्याने ही लीग सुरू करत आहेत. आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड या देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या सहकार्याने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या लीगमध्ये ॲमस्टरडॅम, रॉटरडॅम, बेलफास्ट, डब्लिन, ग्लासगो आणि एडिनबर्ग या शहरांचे ६ संघ सहभागी होतील. २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत हे सामने हेग आणि डब्लिन येथे पार पडणार आहेत.