प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचे निधन
Updated On:

पुणे : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित राहुल बजाज हे ८३ वर्षांचे होते. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली.
बजाज हे गेल्या महिनाभरापासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल बजाज हे राज्यसभेचे खासदार देखील होते आणि त्यांना २००१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते बजाज ग्रुपशी संबंधित होते.
उद्योगपती राहुल बजाज यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. २००१ मध्ये केंद्र सरकारने राहुल बजाज यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते. २००६ ते २०१० पर्यंत राहुल बजाज राज्यसभेचे सदस्य होते. बजाज समूहाला पाच दशकांहून अधिक उंचीवर नेण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा होता.
टॅग्स:





