Rajkummar Rao Film Raftaar: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी ‘रफ्तार’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची नवी रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून आता हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या मोठ्या सुट्टीच्या वीकेंडमध्ये चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ‘रफ्तार’ हा फक्त एक चित्रपट नसून राजकुमार रावच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कारण या चित्रपटातून तो निर्माता म्हणूनही नवा प्रवास सुरू करत आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी खूप खास असल्याचे बोलले जात आहे. (Rajkummar Rao Film Raftaar) या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकर यांनी केले आहे. तर निर्मिती पत्रलेखा हिने काम्पा फिल्मच्या बॅनरखाली केली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता तरुण बाली आहेत. कथा आणि पटकथा रोहन नरूला यांनी लिहिली आहे. तसेच पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्सकडे चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी आहे. (Rajkummar Rao Film Raftaar) रिलीज डेट जाहीर करताना राजकुमार रावने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले की, “स्वप्न पाहण्यासाठी आणि ते घडवण्यासाठी वेळ लागतो. पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप मेहनत, संयम आणि जिद्द लागते. ‘रफ्तार’ हा आमच्या सिनेमाई प्रवासातील पहिला मोठा टप्पा आहे.” Rajkummar Rao- Raftaar Release Date Out त्याने पुढे सांगितले की, जेव्हा एखादी गोष्ट मनाच्या खूप जवळची असते, तेव्हा ती सर्वोत्तम बनवण्यासाठी वेळ देणे गरजेचे असते. त्यामुळेच चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात केवळ कथा नाही, तर संघर्ष, महत्त्वाकांक्षा, भीती आणि आशेचा प्रवास अनुभवायला मिळेल, असेही त्याने म्हटले आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अनुराग ठाकूर, रोहन वर्मा, तान्या मानिकतला आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फौज असल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Rajkummar Rao Film Raftaar) राजकुमार राव हा नेहमी वेगळ्या भूमिका आणि ताकदीच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्यामुळे ‘रफ्तार’कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. इंडस्ट्रीतही या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू असून हा चित्रपट राजकुमारच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे मानले जात आहे. दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात ‘रफ्तार’ बॉक्स ऑफिसवर किती वेगाने धावते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.