गोध्रा जळीत प्रकरणातील आरोपीला जन्मठेप
Updated On:

गोध्रा – गुजरात मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर अयोध्येहून परतणाऱ्या कारसेवकांच्या डब्याला आग लाऊन 59 कारसेवकांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा स्थानिक न्यायालयाने सुनावली आहे.
रफिक भातुक असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी अनेक वर्षे फरार होता. त्याला फेब्रुवारी 2021 मध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्यावर स्वतंत्रपणे हा खटला चालवण्यात आला होता.
गोध्रा जळीत प्रकरणात दोषी ठरलेला तो 35 वा आरोपी आहे. यातील 11 आरोपींना फाशीची आणि 20 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ट्रायल कोर्टाने सुनावली होती. तथापि गुजरात हायकोर्टाने यातील 11 आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेत परावर्तीत केली आहे.



